Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आठवडे बाजारातून महिलेचे १५ ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेचे गळ्यातून ५५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळ्याच्या आठवडे बाजारात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील विद्यानगर येथे हेमलता उमेश पाटील वय २० या वास्तव्यास आहेत. त्या बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील आठवडे बाजारात आल्या होत्या. यादरम्यान हेमलता पाटील यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमचे मंगळसूत्र हेमलता यांना कळू न देता अंत्यत शिताफीने चोरट्यांनी चोरुन नेले. प्रकार लक्षात आल्यानंतर हेमलता यांनी बाजारात शोध घेतला मात्र मंगळसूत्र मिळून आले नाही.  चोरीची खात्री झाल्यावर हेमलता पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.

 

Exit mobile version