Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन कारच्या काचा फोडून ५ मोबाईल लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील जैन एरीगेशन सिस्टीम कंपनीच्या गेटजवळ दोन उभ्या कारच्या काचा फोडून कारमध्ये ठेवलेले मजूरांचे पाच मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मनोज विनाद भामेरे (वय-२१) रा. पहूर पेठ ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत कामाला आहे. रविवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता ते कार क्रमांक (एमएच ३७ जी ३५७४) ने कामाला आले. त्यावेळी त्यांनी कार पार्कींग झोनमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार व बाजूला उभी असलेली दुसरी कार यांच्या काचा फोडून ड्रावर मध्ये ठेवलेले मजूरांचे पाच मोबाईल असा एकुण १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. याबाबत त्यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.

Exit mobile version