Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या इमारतीची भिंत कोसळली; तरूण थोडक्यात बचावला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील रथ चौकातील जोशी पेठ परिसरात जुन्या इमारतीची भिंत कोसळल्याने शेजारी राहणाऱ्या घरातील सामानांचे नुकसान झाले आहे. यात तरूण हा थोडक्यात बचावल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

याबाबत अधिक माहिती‍ अशी की, जळगाव शहरातील रथ चौकालगतच्या जोशी पेठेत संदेश रमाकांत वाणी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या शेजारी चंद्रशेखर प्रभाकर चांदसरकर यांचे जुने इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्याची भिंत ही वाणी आणि चांदसरकर यांची सामायिक आहे. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक जुने इमारतीचे भिंत कोसळली. यात संदे वाणी यांच्या घरातील लाकडी तसचे लोखंडी कपाट आणि टीव्ही दाबले गेले. त्यामुळे यात टिव्हीचे नुकसान झाले आहे. संदेश वाणी यांचा मुलगा दर्शन वाणी (वय-२३) हा सकाळी साडेतीन वाजता उपवासानिमित्त आंघोळ करण्यासाठी गिझर लावायला उठल्यामुळे तो बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version