Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | बारावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली असून उद्या बुधवार ८ जून रोजी दुपारी जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात होते. परंतु यावेळी नेहमीप्रमाणे अंदाजापेक्षा लवकरच १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यावर्षी दहावी अकरावी आणि बारावी या तीनहि वर्गातील गुण ग्राह्य धरून ३०:३०:४० असे गुणोत्तरानुसार निकाल जाहीर केला जाणार असल्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.

यावर्षी संसर्ग प्रादुर्भावामुळे सुरुवातीला ऑनलाईन आणि दुसऱ्या सत्रात ऑफलाईन असे शिक्षण विद्यार्थ्यांनी घेत ऑफलाईन परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्ध्यासाठी निकालाची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे दहाव्या वर्गातील तीन विषयात सर्वात जास्त मिळालेले सरासरी ३० टक्के गुण, अकरावीतील मूल्यमापन विषयानुसार ३० टक्के गुण आणि बारावीतील सराव परीक्षा, चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा आणि मूल्यमापन असे ४० टक्के गुणांचा एकत्रितपणे विचार करूनच बारावीचा निकाल जाहीर केला जाईल.

Exit mobile version