Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृउबा सामितीच्या आवारातून भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कृउबा समितीच्या आवारातून भाजीपाला विक्रेत्याची २८ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, शालिक सुधाकर बागुले (वय-४०) जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे दररोज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजीपाला खरेदी करण्यासाठी दुचाकीने जातो. नेहमीप्रमाणे १ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता शालिक बागुले हा दुचाकी (एमएच १९ बीएफ ८८१४) ने शहरातील कृउबा समितीच्या आवारात गेला. त्याठिकाणी दुचाकी पार्क करून भाजीपाला घेण्यासाठी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची २८ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सकाळी ८ वाजता उघडकीला आले. सर्वत्र शोध घेतला दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

 

Exit mobile version