Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचा दुदैवी मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील म्हैसवाडी येथे घडली आहे. वनविभागाच्‍या वतीने अग्नीडाग देवून हरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

याबाबत अधिक वृत्त असे की, यावल तालुक्यातील म्हैसवाडी गाव शिवारात २० जुन रोजी भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्या सुमारास ३ वर्ष वयाचे वनप्राणी हरीण हिच्यावर विविध ठिकाणी चावा घेत गंभीर जखमी केले होते. याबाबत गावातील मयुर कांतीलाल चौधरी, समाधान सुपडु कोळी आणी सागर रविन्द्र कोळी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.  जखमी झालेल्या हरीणला बामणोद येथील प्रभाकर भोजु सरोदे यांच्या शेड मध्ये ठेवण्यात आले. यावेळी त्यांना म्हैसवाडीचे उपसरपंच ब्रिजलाल कोळी, प्रदीप कोळी, समाधान कोळी आणी रिधुरीचे सर्पमित्र किशोर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले.

 

सदरच्या घटनेची माहीतीनुसार यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्यासह फैजपुर विभागाचे वनपाल अतुल तायडे, वनरक्षक नंदलाल वंजारी, जानोरीचे वनरक्षक सुपडु सपकाळे यांनी तात्काळ हरीणला यावल येथे आगारात आणले असता उपचारा दरम्यान तिचा मंगळवारी २१ जुन रोजी मृत्यु झाला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आर.पी. भगुरे यांनी प्रथम उपचार व उपचारादरम्यान मरण पावलेल्या मृत हरीणचे शवविच्छेदन केले व नंतर वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मरण पावलेल्या हरीण रोपवाटिकेच्या परिसरात संध्याकाळच्या सुमारास अग्नीडाग देवुन अंत्यविधी करण्यात आले.

Exit mobile version