Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेरोजगारांचा ‘आक्रोश मोर्चा’ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला (व्हिडीओ)

fe216f0d 56a1 438e b82e 050759f51e49

जळगाव (प्रतिनिधी)  लोकसंघर्ष मोर्चातर्फे काल (दि.६) भुसावळ येथून बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तेथून निघालेले मोर्चेकरी आज दुपारी २.०० वाजता येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान काल रात्री मोर्चेकर्यांनी नशिराबाद येथे मुक्काम केला होता.

लोकसंघर्ष मोर्चातर्फे बेरोजगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भुसावळ ते जळगाव आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आणि महाराष्ट्र सह चार राज्यांमधून हजारो बेरोजगार तरूण या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनी विविध घोषणा देत शासनाचा निषेध केला. ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरती करा, २० टक्के कोटा त्वरित रद्द करावा, महानिर्मिती, महावितरण, महापारेषण, ऑर्डनन्स फॅक्टरी, महाराष्ट्र एस.टी. महामंडळ येथील अप्रेंटिस विद्यार्थ्यांना कायमची नोकरी द्या, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा, सर्व रिक्त शासकीय जागा भरून त्यात कंत्राटी व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य द्या, आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Exit mobile version