Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेंदालाल मिल परिसरातून दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरातून 25 हजार रुपये किंमतीची एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शेख अखईल शेख अजगर (वय-२२) रा. भारत नगर मज्जित जवळ जळगाव हा मोलमजुरी करून आपला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवार 13 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास (एमएच 19 डीसी 8122) क्रमांकाची दुचाकी शहरातील गेंदालाल मिल लका चहाच्या दुकानासमोर लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळून न आल्याने शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनीवर मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर निकम करीत आहे.

 

Exit mobile version