Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिक्षाने कट मारल्याने दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडवरील रोहिणी स्वीट मार्ट जवळ रिक्षाने दुचाकीला कट मारल्याने एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष भालचंद्र चव्हाण (वय-५२) रा. रामबाग कॉलन, आयएमआर कॉलेज समोर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वकील करून आपला उदरनिर्वाह करतात. ९ जून रोजी रात्री ८ वाजता संतोष चव्हाण हे दुचाकीने रिंगरोडवरील रोहिणी स्वीट मार्ट समोरून जात असतांना रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू १५८३) ने जोरदार कट मारला. त्यात संतोष चव्हाण हे जखमी झाले. तर दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत संतोष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षा चालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.

 

Exit mobile version