Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरासमोरील दुचाकी मध्यरात्री चोरट्यांनी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रौनक कॉलनीतून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ‘प्रकाश शालीग्राम चौधरी (वय-५२) रा. रौनक नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी (एमएच १९ एडब्ल्यू ७६१२) घरासमोर पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे ९ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आले.

त्यांनी त्यांची दुचाकीचा शोधाशोध केली पंरतू कुठेही आढळून न आल्याने अखेर तीन दिवसांनी मंगळवरी १२ एप्रिल रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

Exit mobile version