Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातून अल्पवयीन मुलीला दोघांनी पळविले

यावल / फैजपुर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील राहणाऱ्या मुलीला भावाला धक्का देत दोन जणांनी दुचाकीवरून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. यावल तालुक्यातील फैजपूर येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मुलगी, तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघेजण रविवार २० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आले होते. दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिडीत मुलीसह तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तीघे घरी जात होते. त्याचवेळी जीवन अशोक भालेराव रा. भालोद ता. यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा. सावदा ता. रावेर हे दुचाकीवर आले. दोघांनी पीडीत मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का दिला व “मुलीला सोडले नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवून पिडीत मुलीचा दुचाकीवर बसवून पसार झाले.

याबाबत दोघांनी लागलीच फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जीवन अशोक भालेराव रा. भालोद ता. यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा. सावदा ता. रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.

 

Exit mobile version