Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यंदा तिरंगा न्यूयॉर्कमध्येही फडकणार

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे.

५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला होता. अमेरिकेतील फेड्रेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) ही माहिती दिली आहे.

दरवर्षी एफआयएकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. यानिमित्त छोट्या परेडचंही आयोजन करण्यात येते. मात्र यंदा करोनाचा पार्श्वभूमीवर परेड रद्द करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासचे रणधीर जैसवाल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

एम्पायर स्टेट बिल्डींगवर १४ ऑगस्टच्या रात्रीपासून तिरंग्याची रोषणाई करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या एफआयएची स्थापना १९७० साली झाली आहे. एफआयएच्या स्थापनेचं हे सुवर्ण मोहत्सवी वर्ष आहे.

Exit mobile version