Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचतांना तरुणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील कानळदा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचतांना चक्कर येवून कोसळल्याने जितेंद्र ज्ञानेश्वर बाविस्कर (वय २८, रा. काळनदा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा येथे सोमवारी गणरायाचे विसर्जनाची गावातून मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गावातील जितेंद्र बाविस्कर हा तरुण सहभागी झाला. मिरवणुकीमध्ये नाचत असतांना सायंकाळच्या सुमारास जितेंद्रला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. गावातील तरुणांनी लागलीच वाहनातून जितेंद्रला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.

Exit mobile version