Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी विकास सोसायटीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थापनेपासून ते आजवर कधीही निवडणूक न झालेल्या पाळधी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक यंदा देखील बिनविरोध झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनवरोधची परंपरा यंदा देखील कायम राखण्यात आली आहे.

यासाठी ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले असून यात गावातील प्रत्येक जाती समूहाला योग्य प्रतिनिधीत्व प्रदान करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, “पाळधी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आलेला होता. ही निवडणूक बिनविरोध झाली. पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या सोसायटीच्या चेअरमन पदी गोकुळसिंग पाटील (भटू दादा) तर व्हाईस चेअरमन पदी सामाजिक कार्यकर्ते संजय माळी आणि विद्यमान सदस्यपदी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, रामदास पुंडलिक सपकाळे, शे. मजीद सत्तार, राजेंद्र झावरू चौधरी, गोपाळ शालिग्राम पाटील, वासुदेव पौलाद पाटील, भरत साहेबराव पाटील, नूतन नरेंद्र कुलकर्णी, सुनंदा कैलास धनगर, गोकुळसिंग प्रल्हाद पाटील, भावलाल गोविंदा ननवरे यांची निवड झाली आहे.”

निवडणुकीचे काम निर्णय अधिकारी ए. टी. नदवाड यांनी पाहिलं. तसेच संस्थेचे सचिव अनिल पाटील आणि क्लर्क पांडुरंग कुलकर्णी यांनी देखील सहकार्य केले. नवनियुक्त कार्यकारिणीचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

पाळधी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची स्थापना १९२६ साली झाली असून आजवर येथे एकदाही निवडणूक झालेली नाही. गेल्या ३० वर्षांपासून ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गर्दनाखाली निवडणूक बिनविरोध झालेली आहे. ही परंपरा यंदा देखील पाळण्यात आली असून यात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून सर्वसमावेश सदस्यांना संधी प्रदान करण्यात आलेली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या निवडीचे स्वागत करून सोसायटी भविष्यातही शेतकरी हिताचे काम करेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

Exit mobile version