Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यापाऱ्याची दुचाकी लांबविली; पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील एका व्यापाऱ्याची दुकाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवार १२ ऑगस्ट रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन प्रभाकर पाटील (वय-४२) रा. बोरगाव ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीटी ४२०४) ही त्यांच्या घरासमोर पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्याने रात्री १० वाजेच्या सुमारास ४५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी १२ ऑगस्ट रोजी  व्यापारी सचिन पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.

Exit mobile version