Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दि बर्निंग ट्रकचा थरार !; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

खामगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खामगाव येथील एका पेट्रोल पंपाच्या पार्कींगमध्ये उभा असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवन हानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे विजय लक्ष्मी पेट्रोल पंपच्या पार्किंगमध्ये ट्रक उभा होता. रविवारी रात्री अचानकपणे उभा ट्रकने पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप असल्याने मोठी खळबळ माजली होती. यात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पण एकंदरीत आपल्या वाहनांची वेळोवेळी दुरुस्ती व निगराणी करणे आवश्यक आहे .नाहीतर वायरिंग मधल्या शॉर्टसर्किटमुळे जीवितासोबत वाहन देखील धोक्यात येऊ शकते.

Exit mobile version