Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महामार्गावर ‘द बर्नींग ट्रक’चा थरार : नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ते छत्रपती संभाजी महाराज नगर महामार्गावर वाढत्या तापमानामुळे चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली असून परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव ते छत्रपती संभाजी महाराज रोडवर माळपिंपरी गावाशेजारील भवानी फाट्याजवळ गहू भरून नेणारा ट्रक क्रमांक आर जे ०९ जी डी ९००५ हा रस्त्याने जात असताना अति तापमानामुळे ट्रकने पेट घेतला. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, पाळधी येथील सरपंच कमलाकर पाटील तसेच दत्ता साबळे, पद्माकर पाटील, मोहन भोजने, संतोष भोई, अतुल पाटील यांच्यासह नागरिकांनी तात्काळ जामनेर अग्निशामक बंब पथकाला पाचारण केले. त्यामुळे कोणतेही प्रकारे जीवित हानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात तापमानाचा पार चढल्यामुळे अशा प्रकारे आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे.

Exit mobile version