Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सामूहिक अत्याचार प्रकरणात ओळख परेडमध्ये तिसरा संशयीत अटकेत

3c6adbe0f02f784bc69b3091dfc24b2a

यावल (प्रतिनिधी ): तालुक्यातील बामणोद येथील तरुणीवरील सामुहीक अत्याचार प्रकरणातील तीस-या संशयीत आरोपीची आज ओळख परेड होऊन त्यास यावल पोलिसांनी अटक केली आहे.

 

बामणोद येथील तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणात तिसरा संशयित येथील यश विजय अडकमोल (वय २० ) असून त्याची येथील तहसीलदार यांच्या बंद दालनात निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आर. के. पवार यांच्या समोर ओळख परेड घेण्यात आली . संशयीतास यावल पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे या सामुहीक अत्याचार प्रकरणातील आतापर्यंत अटकेतील संशयितांची संख्या तीन झाली असून दोघांची ओळख परेड यापुर्वीच झालेली आहे. यापूर्वीच अटकेत असलेल्या आकाश बिऱ्हाडे,व निलेश सपकाळे यांची पोलिस कोठडी येत्या ९ मे पर्यंत आहे. तर तिसऱ्या संशयितास ९ मेस न्यायालयात हजर केले जाणार आहे.तिसरा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत पोलीसांनी यावल येथील आकाश बि-हाडे, निलेश सपकाळे यांचेसह यश अडकमोल अशा तीन संशयितांना तपासाधिकारी तथा पो. नि. डी. के. परदेशी, फौजदार सुनिता कोळपकर, हे. कॉ. संजय तायडे याचें पथकाने अटक केली असून शहराबाहेरील दोघे संशयित पोलीसांच्या पटलावर आहेत त्यांचा शोधही तपास पथक घेत आहे. ८ एप्रील ते १२ एप्रील दरम्यान युवतीवर यावलसह भुसावळ, ब-हानुपर येथे अत्याचार करण्यात आले होते. याप्रकरणी घेण्यात आलेल्या ओळख परेडचा गोपनिय अहवाल तहसीलदार कार्यालयाकडून न्यायालयात सादर करण्यात येईल असे निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी सांगीतले आहे.

Exit mobile version