Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराच्या खिडकीत हात घालून चोरट्याने तरुणाचा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील प्रभात चौक परिसरातील समर्थ कॉलनीत घराच्या खिडकीत हात टाकून चोरट्याने तरुणाचा १२ हजारांचा मोबाईल लांबविल्याची घटना समोर आली आहे. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील प्रभात चौक परिसरातील समर्थ कॉलनीत समर्थ निवास येथे पांडुरंग हरीभाऊ गाढे वय २६ हा तरुण वास्तव्यास आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील शीरापूर गात या गावाचा रहिवासी आहे. शहरातील संजीवनी हॉस्पिटल येथे तो डायलीसीस टेक्नीशियन म्हणून कामाला आहेत. पांडुरंग याने १४ जून रोजी नेहमीप्रमाणे त्याचा मोबाईल खोलीच्या खिडकीत ठेवला होता. सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचा मोबाईल खिडकीत दिसला नाही. समर्थ निवासमधील इतरांना विचारणा केली असता, मोबाईलबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर चोरीची खात्री झाल्यावर पांडुरंग याने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.

Exit mobile version