Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्यरात्री घरातून दागिन्यासह चांदीचे देव व शिक्क्यांची चोरी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निंभोरा गावात मध्यरात्री बंद घराची कडी हात घालून उघडून घरातून सोन्याचे दागिने आणि देवघरातील चांदीची मुर्ती व शिक्के असा एकुण ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर आसाराम पाटील-देसले (वय-५५, रा. निंभोरा ता. अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २४ फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वर पाटील हे परिवारासह घरात झोपले होते. त्यावेळी घरातील कडी आतून बंद करण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री हात घालून आतील कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि देव घरातील चांदीचे देव व शिक्के असा एकूण ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार पहाटे चार वाजता उघडकीला आला. त्यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीवारी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल आगोणे करीत आहे.

Exit mobile version