Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतातून २५ हजार रूपये किंमतीची केबल वायरची चोरी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील शेतातून २५ हजार रूपये किंमतीची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील शेत गट क्रमांक १३ मधील जैन टिशू कल्चर पार्क सिस्टम येथून अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीचे ४५० मिटर केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील सुपरवायझर मनोहर काशिनाथ बाविस्कर वय-३७ रा. टाकरखेडा ता. एरंडोल यांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १८ मे रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Exit mobile version