Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज -आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी आरोग्य व तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज असून झालेल्या तयारीच्या अनुषंगाने ती लाट येण्याआधीच रोखण्यात आम्ही यशस्वी राहू असा विश्वास आ. अनिल पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकू व पांतोंडा येथील रुग्णवाहिकांच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.

रूग्णसेवेच्या बळकटीकरणासाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका पार पाडतील असा आशावादही आमदारांनी व्यक्त उर्वरित रुग्णवाहिका देखील लवकरच प्राप्त होतील अशी ग्वाही दिली. तसेच कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे सर्वांनी अनुभवलेच असल्याने. या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी तालुका प्रशासनाला आधी 2 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्या, आता दुसर्‍या टप्प्यात  प्रा.आ.केंद्र ढेकु व प्रा.आ.केंद्र पातोंडा येथे रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त कोरोना लसीकरण देखील वेगाने सुरू असल्याने त्याचा देखील मोठा फायदा आपल्याला होईल असा विश्वास व्यक्त करत ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी आवर्जून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी आमदारांच्या हस्ते रूग्णवाहिका चालकांना चावी देऊन हस्तांतर करण्यात आले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील,प्रविण पाटील एल.टी.पाटील, मुशीर शेख व वाहनचालक उपस्थित होते.

Exit mobile version