Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगावच्या तरूणाची अचानक एक्झीट; कारण गुलदस्त्यात !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने राहत्या घरात दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अलताफ युनुस पटेल वय-३८ रा. किनगाव ता.यावल असे मयताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अलताफ पटेल हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बुधवारी ३ ऑक्टोबर दुपारी ४ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान हा प्रकार त्याचा भाऊ सलमान घरी आल्यावर लक्षात आले. त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. पुढील तपास पो.नि. राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ वासुदेव मराठे हे करत आहे. मयत अलताफ युनुस पटेल याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगी, आई, एक भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version