Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवीचे यश; दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम

पाचोरा प्रतिनिधी । गेल्या तीन महिन्यांपुर्वी वडिलांचे अकाली निधन झाल्याचे दुःख पेलवत पल्लवीने एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १०० टक्के गुण मिळवुन पल्लवी हिने पाचोरा तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 

पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमधील शिक्षक शशिकांत ताराचंद लासुरकर यांचे गेल्या तीन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दु:ख पल्लवीचे पेलवणारे नसतांनाच तिने या दु:खद परिस्थितीचा सामना करत एस. एस‌. सी. परिक्षेत घवघवती यश संपादन केले. पल्लवी शशिकांत लासुरकर ही येथील बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलमधुन शिक्षण घेत नाशिक बोर्डाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून पाचोरा तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. 

पल्लवी हिला बुऱ्हानी शाळेच्या मॅनेजिंग कमिटी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. ती श्रीमती संगीता शशिकांत लासुरकर  व गो. से. हायस्कूल येथील शिक्षक कै. शशिकांत ताराचंद लासूरकर यांची कन्या व सेवा निवृत्त जिल्हा परिषद मुख्याध्यापक ताराचंद अर्जुन लासूरकर यांची नात आहे. पल्लवी हिचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Exit mobile version