Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वडीलानंतर पोरक्या झालेल्या लेकीच्या जिद्दीची कहाणी..

बुलढाणा – अमोल सराफ | मेट्रो सिटीमध्ये अनेक महिला प्रवासी वाहन चालवताना आपण पाहल्या असतील, मात्र बुलढाण्यात वडील गेल्यानंतर वयाच्या अवघ्या आठराव्या वर्षी एका युवतीने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलीये…. स्वतःच्या शिक्षणासोबतच चार बहिणींच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी तीने घेतलीये.. त्यासाठी ती प्रवासी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहे.  कोण आहे ती नवदुर्गा ? पाहूया  हा खास रिपोर्ट….

 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या हिवरा गावात राहणारी ही आहे अस्मिता वाकोडे, वय वर्ष अवघ १८… तीन वर्षांपूर्वी हृदय विकाराने अचानक वडील गेल्यानंतर कुटुंबाचा गाडा हाकायची जबाबदारी अस्मितावर येऊन पडलीये.. अस्मितानेही ही जबाबदारी लीलया पेलली आहे… वडील चालवत असलेले प्रवासी वाहन आता अस्मिता चालवत आहे. अस्मिताने मिळवलेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो..

घरात चार लहान बहिणी, वृद्ध आजी-आजोबा आणि आई… आजोबांची वृद्धापकाळाने दृष्टी गेल्याने घरात कुणी कर्ता पुरुषच नाही.. अशा संकटांच्या सावटाखाली अख्या कुटुंबाला बळ देण्याचे काम अस्मिता करतीये.. घरातील कर्त्या पुरुषाप्रमाणेच अस्मिता घरातील प्रत्येकाला जपत आहे. सकाळी बहिणींना शाळेत नेऊन सोडणं त्यानंतर स्वतःच शिक्षण करणं आणि सोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह  चालेल यासाठी प्रवासी वाहन चालवणं अशा सर्व गोष्टी करत तारेवरची कसरत करून ती आपल्या कुटुंबाचा करता पुरुष बनलिये…

 

आपल्या नातीने खूप शिकावं मोठं व्हावं सोबत लहान बहिणींना शिकवावं तिच्यासाठी आम्ही उतार वयातही मेहनत घ्यायला तयार आहे. तिला पाहिजे त्या ठिकाणी मानसिक बळ द्यायला तयार आहे. आमच्या कुटुंबासोबत अस्मिताने गावाचं नाव सुद्धा मोठं केलंय अशी भावना अस्मिताची आजी बोलून दाखवते.

शहरी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रवासी वाहन चालवणाऱ्या अनेक महिला आपण पाहिले असतील. मात्र ग्रामीण भागात प्रवासी वाहन चालवणारी कदाचित अस्मिता पहिली मुलगी असेल जी आपल्या शिक्षणासोबत बहिणींच्या शिक्षणाची काळजी घेऊन प्रवासी वाहन चालवत आहे. तिच्या या हिमतीला गावातून सुद्धा प्रचंड पाठबळ मिळत आहे. तिची ही जिद्द पाहून अनेकांना तिचा आदर्श घ्यावा वाटतो आणि ज्या संकटांना अस्मिता सामोरे जाते ते पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू देखील ओघळत आहेत.

अस्मिता स्वतः शिकून आयपीएस व्हायचं सोबतच आपल्या बहिणींना सुद्धा शिकून मोठा करायचं आणि कुटुंबाची आज असलेली परिस्थिती बदलून दाखवायची तिच्या या संघर्षातून सक्सेस मिळवण्याच्या जीद्धीला सलाम…

Exit mobile version