Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात पुन्हा कोसळला दगडी दरवाजा; दोन जखमी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पुरातत्व स्थळाचा दगडी दरवाजा आज पुन्हा कोसळल्याने दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून दगडी दरवाजाचे काम कासवगतीने सुरू आहे, हेच काम सुरू असताना अचानक आज एका बाजूचा बुरुज पूर्णपणे कोसळला आहे. दरम्यान सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नसली तरी संबंधित ठेकेदार व पुरातत्व विभाग मोठी दुर्दैवी घटना होण्याची वाट तर पाहत नाहीये ना? असा संतप्त सवाल आज अमळनेर कर या घटनेनंतर करीत आहेत. अनेक दिवसापासून रखडलेल्या कामात, काम चुकारपणा व थुंकी लावून हे काम होत असल्याचा आरोप देखील यानिमित्ताने होताना दिसून येत आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करून एवढ्या धीम्या गतीने सुरू असलेले काम जर पूर्ण होण्याआधी असे काही महिन्यातच कोसळत असेल तर हे काम खरच गुणवत्ता पूर्वक होत असेल का?अमळनेरची ऐतिहासिक ओळख असलेल्या दगडी दरवाजा ची साडेसाती संपणार का? असे अनेक  प्रश्न उपस्थित होत आहेत.

Exit mobile version