Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे बापरे :भरधाव डंपरने क्रूझरला उडविले; तीन ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव डंपरने क्रूझरला दिलेल्या धडकेत तीन ठार झाले असून चार जर जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात महामार्गावर बांभुरी जवळ घडला. शिवलींग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने क्रूर झडप घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवलिंग घेण्यासाठी ओंकारेश्‍वरला जाणार्‍या भाविकांच्या गाडीला भरदार वेयाने येणार्‍या वाळूच्या डंपरने उडवल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या बांभोरीजवळ हा अपघात झाला आहे.

मृत झालेल्यांमध्ये विजय चौधरी (४०), तुषार जाधव (२८) व भूषण खंबायत (३५, सर्व राहणार साई नगर, जळगाव ) यांचा समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगावातील साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणार्‍या डंपर ने क्रुझरला दिलेल्या जोरदार धडकेत, भीषण अपघात झाला. त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविले होते.

Exit mobile version