‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्राप्त पोलीसांचे एसपींनी केले अभिनंदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ नुकतेच प्रदान करण्यात आले. यानिमित्ताने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी राष्ट्रपती पदक मिळविणाऱ्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्याचे त्यांचा सन्मान करत अभिनंदन केले.

याबाबत माहिती अशी की, “स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील आणि जिल्हा मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भिकन सोनार यांना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल दि.२१ मार्च रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. दोघांना एका कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आले.

यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिकन सोनार यांनी त्‍यांच्या सेवा काळात केलेल्या लिस्ट स्वरूपाचे गुन्ह्यांचा तपास सातत्यपूर्ण केल्याने त्यांनी केलेल्या विशेष सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. आज गुरुवार, दि. २४ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करत अभिनंदन करण्यात आले.

Protected Content