Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘लिव्ह इन’ मधून जन्मलेला मुलगाही बापाच्या संपत्तीत हक्कदार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘लिव्ह इन रिलेशनशी’पमधून जन्माला आलेला मुलगा देखील हा बापाच्या संपत्तीत हक्कदार असतो असा महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने एका खटल्यात दिला आहे.

केरळमधील एक महिला व पुरूष एकमेकांशी विवाह न करता एकत्र राहत होते. त्यांनी विवाह केला नव्हता. यानंतर त्या मुलाला आपल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळणार नसल्याचा निकाल केरळच्या हायकोर्टाने दिला होता. या प्रकरणी त्या मुलाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन याचा निकाल देण्यात आला. यात सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करतांनाच एक महत्वाचे भाष्य देखील केले आहे.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, कोणताही पुरूष अथवा स्त्री ही विवाह न करतांनाही एकत्र राहत असतील तर त्यांना पती-पत्नी असेच मानावे लागणार आहे. या संबंधातून जन्माला आलेली अपत्ये हे संबंधीत बापाच्या मालमत्तेत भागीदार असतील असे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे बजावले आहे. अर्थात, यासाठी सदर मूल हे दोघांचेच असल्याचे डीएनड चाचणीतून सिध्द झालेले असावे असे देखील कोर्टाने म्हटले आहे.

Exit mobile version