Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नव्या वाहतूक नियमांचा सामाजिक प्रभाव

helmet

मुंबई प्रतिनिधी । नव्या मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग केल्यास जबर दंड आकारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. मात्र यासंदर्भात सध्याला एक व्हिडिओ चांगल्याच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत एका बाइकस्वाराने सर्व कागदपत्रे हेल्मेटवर लावल्याचे दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या व्हिडीओतील जो व्यक्ती आहे. रामपाल शाह असे बाइकस्वाराचे नाव आहे. तो इन्श्यूरन्स एजंट असून, ते रॉयल एनफिल्ड चालवतात. मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग केल्यास वाहतूक पोलीस संबंधित चालकांकडून जबर दंड वसुली करतात. त्यामुळे हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे लावून प्रवास करायचा असे त्यांनी ठरवले आहे. हेल्मेटवर वाहनचालक परवाना, पीयूसी, आरसी बुक आणि विमा पॉलिसी आदी कागदपत्रे त्यांच्या हेल्मेटवरच लावली आहेत. अनेक वाहनचालकांकडे सर्व कागदपत्रे असतात. मात्र काही जण घरी विसरतात. त्यामुळे भुर्दंड बसतो. जर मीही घरी कागदपत्रे विसरलो, तर मलाही हा जबर दंड भरावा लागेल. बाइकवरून निघालो की हेल्मेट घालतोच. आता तर हेल्मेटसोबत सर्व कागदपत्रेही सोबत असतात. वाहतूक पोलिसांनी अडवलं तर मी लगेच त्यांना कागदपत्रे दाखवतो. यामुळे मी ही कल्पना लढवली, असे शाह यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version