Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुकानदारांकडून ग्राहकाने पक्के बिल घेणे आवश्यक – देवगुणे

raver 4

 

रावेर प्रतिनिधी । प्रत्येक व्यक्ती हा कुठे-ना-कुठे ग्राहक असतो. बाजार पेठेतील वस्तु किंवा सेवा खरेदी करतांना ग्राहकाने जागरूक असणे गरजेचे असून संबधीत दुकानदारांकडून बिलाची पक्की पावती घेणे आवश्यक आहे. जर फसवणूक झाल्यास घेतलेल्या बिलाच्या आधारावर न्याय मिळवण्यास मदत होते, असे प्रतिपादन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रला सुरुवात झाली. यावेळी ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते. यासाठी ग्राहकांनी काय केले पाहिजे, ग्राहक दिन का साजरा केला जातो. यावर विविध ग्राहक संघटनेच्या पदाधिका-यांची उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ग्राहकांची वस्तु खरेदी करतांना कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली असल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक तक्रार मंच यांच्या दालनात तक्रार करावी व आपकी कशी फसवणूक झाली आहे, हे न्यायालयात मांडावे. आपल्या तक्रारमध्ये काही तथ्य असल्यास आपल्याला त्याची नुकसान भरपाई मिळते, असे प्रतिपादन साहित्यिक अ.फ भालेराव यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला साहित्यिक अ.फ.भालेराव, तहसिलदार उषाराणी देवगुणे, अॅड.धनराज पाटील, डॉ.गुलाब पाटील, अॅड.एम.ए.खान, दिलीप कांबळे, बाळु शिरतुरे, मनिष नाईक, नायब तहसिलदार सी.जी.पवार, शारदा चौधरी, शिक्षका ई.बी.नाईक, शिरीष वाणी, डॉ.संगीता महाजन, पुरवठा अधिकारी अतुल नागोरभोजे, वजन माप निरिक्षक एस.आर.खैरनार, क्षेत्र सहाय्यक एस.आर.सुरवाडे, एस.एल.लोहार, शैलेंद्र तरसोदे, डी.डी.वाणी, योगेश पाटील, अशोक महाजन यांच्यासह आदी शासकीय कर्मचारी महिला व ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय पाटील यांनी केले.

Exit mobile version