Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान होणार सील : आ. किशोर पाटील (व्हिडीओ)

 

पाचोरा, प्रतिनिधी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे  बंधनकारक असून चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान सील करण्याचा निर्णय आ. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपविभागीय कार्यलयात बैठकीत घेण्यात आला. 

पाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनाने गांभीर्य लक्षात दि. १२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यात येत्या पाच दिवसात शहरासह ग्रामिण भागातील लहान- मोठ्या व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. व्यावसायिकांना टेस्ट केल्यानंतर आलेल्या रिपोर्टच्या आधारे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन दि. १८ मार्च पासुन ज्या व्यावसायिकांकडे कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र नसेल अशी दुकाने तात्काळ सिल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न सोहळ्यात जास्तीत जास्त १०० वऱ्हाडी अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली असल्यास त्याचे कुटुंबियांना घरातच क्वाॅरटाईन  करुन शेजाऱ्यांनी त्यांना घरा बाहेर पडु देवु नये, अशा विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, सागर ढवळे (भडगाव), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पंचायत समिती गटविकास अधिकारी अतुल पाटील, न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, मेडीकल आॅफीसर प्रिया देवरे (लोहटार), डॉ. सागर सय्यासे (नांद्रा), डॉ. प्रशांत बोरसे, विलास सनेर, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version