Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय संतपदी पुरुषोत्तम दास महाराज यांची निवड

faizpur

फैजपूर प्रतिनिधी । खंडोबा देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांची राष्ट्रीय संतपदी निवडी झाल्याबद्दल आज दि.3 ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच गुरुपौर्णिमा व ब्रम्हलीन घनश्यामदास महाराज यांचे प्रथम पुण्यतिथी निमित्ताने खंडोबा देवस्थानात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 रोजी संतसंमेलनात दिगंबर आणि आखाडा नाशिकचे अध्यक्ष रामकिशोर शास्त्री यांनी महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांना राष्ट्रीय संत ही पदवी दिली. खंडोबा देवस्थानात येणारे संत महंत यांची अन्न, वस्त्र, निवाराची व्यवस्था होणे गरजेचे आहे. माझ्या कार्यकाळात कोणीही संत महंत खाली हात परत जाऊ नये. यासाठी लवकरच भक्तनिवासाचे काम सुरु करण्यात येईल व खंडोबा देवस्थानचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचवण्याचे कार्य आहे. मला राष्ट्रीय संत ही उपाधी संत संमेलनात देण्यात आल्यामुळे मी सर्व संत महंतचा ऋणी आहे, असे राष्ट्रीय संत गादीपती पुरुषोत्तमदास महाराज यांनी यावेळी सांगितले.

महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांचे कार्य भारत भर असून, चारही कुंभमेळाव्यात आलेले भक्तगण यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवपुरी, फैजपूर येथील देवस्थानातून साधू संतमहंत खाली हात परत जात नाही. हा भक्तिभाव कार्याची जाणीव लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय संत ही उपाधी देण्यात आली. ही फैजपूर वाशियांसाठी अभिमानाची बाब आहे. खंडोबा देवस्थानात दररोज सकाळ संध्याकाळ पूजा, आरती  धार्मिक कार्यक्रम होत असतात. मंदिराचे वातावरण भक्तिमय झाले असून भक्तांचा ओघ वाढत आहे.

राष्ट्रीय संत उपाधी बद्दल फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी राष्ट्रीय संत पुरुषोत्तम दास महाराज यांचा बुके देऊन सन्मान केला आहे. यावेळी सप्तश्रृंगी वणीगडचे महंत विष्णुदास महाराज, धर्माबादचे शिवमदास महाराज, राममनोहरदास, पवन यादव, सुरेश परदेशी, गोविंदा गलवाडे, अरुण होले, गणेश गलवाडे, नंदू अग्रवाल, चंदू कोळी, चंद्रकांत भिरूड, चोलदास पाटील, सुनील कोळी, संदीप राणे, राहुल साळी, रवींद्र भारंबे, गोविंदा नारखेडे, बाळू नारखेडे, धनराज नारखेडे, पंडित राणे आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version