Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईदगाह मैदनाजवळील भंगाराच्या दुकानाला भीषण आग ! (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली जवळ असलेल्या ईदगाह मैदानाजवळील कॉम्प्लेक्समधील एका टायर दुकानाशेजारी कचऱ्याला बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातील टायर आणि रबरी साहित्य आगीत आल्याने हवेत दूरवरून धुराचे मोठ-मोठे लोळ दिसून येत होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबांनी ही आग आटोक्यात आणण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या ईदगाह मैदानाजवळील एका टायर दुकानालगत असलेल्या कचऱ्याला बुधवारी १२ ऑक्टोबर रेाजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आग मोठ्या प्रमाणात पसरून दुकानातील टायर आणि इतर साहित्य आगीच्या तावडीत सापडले. दुकानातून उठत असलेले धुराचे लोळ दूरवरून दिसून येत असल्याने उपस्थित नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर महापालिकेचा घटनेची माहिती देण्यात आली. काही मिनिटाच्या आत अग्नीशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अजून बंब मागविण्यात आले आहे. या आगीत टायर, रबरी साहित्य आणि भंगारात असलेले काही जुने चारचाकी वाहने जळून खाक झाली असून किती नुकसान झाले याची माहिती समजू शकली नाही. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. या आगीबाबत पोलीसात ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version