Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आत्मनिर्भर भारतासाठी युवाशक्तीची भूमीका महत्वाची – अ‍ॅड.राहूल वाकलकर

पारोळा प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेकडून स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ चाळीसगांव येथील स्वयंदीप दिव्यांग महिला विकास संस्थेत साजरा करण्यात आला.

विश्वपटलावर भारतीय संस्कृतीची महानता दर्शविणारे, युवांचे प्रेरणास्त्रोत,राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करून युवा परिषेदेकडून युवा दिन साजरी करण्यात आला. यावेळी दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष मिनाक्षीताई निकम यांनी जयंतीनिमित्ताने विवेकानंदांचे विचार राष्ट्रनिर्माणाच्या उभारणीसाठी मोलाचे आहे. देशातील युवाशक्तीने विवेकानंदांच्या आचारणातील भारत घडवण्यासाठी कटिबद्ध राहावे असे प्रतिपादन केले.

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर यांनी सांगताना स्वामी विवेकानंद म्हणजे तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी केवळ भारतातील नव्हे तर संपूर्ण जगा जगातील तरुणांसमोर आदर्श जीवनाचा वस्तुपाठ मांडला. म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी “राष्ट्रीय युवा दिन” साजरा केला जातो. ज्ञान व विज्ञानाच्या विश्वात वावरणाऱ्या आजच्या युवा पिढी ने ‘उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या मूलमंत्राचे पालन करत देशाच्या प्रगतीस हातभार लावावा. आज तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश हा स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा देश म्हणून ओळखला जावा, हेच स्वामी विवेकानंदाना खरे अभिवादन ठरेल. यावेळी चाळीसगांव भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे उपाध्यक्ष मोहित शिरोडे यांनी स्वामी विवेकानंदांचे प्रतिमा स्वयंदीप संस्थेस भेट दिली.

यावेळी मिनाक्षी निकम, अ‍ॅड.राहूल वाकलकर, भारती चौधरी, सविता राजपूत, कविता राजपूत, युवा परिषदेचे उपाध्यक्ष मोहित शिरोडे, पारोळा युवा परिषदेचे अध्यक्ष कुंदन पाटील, उपाध्यक्ष अक्षय निकम, समाधान मगर, व दिव्यांग परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version