Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजोरा फाटा ते अंजाळा रस्त्याची भयंकर दुर्दशा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल भुसावळ मार्गावरील राजोरा फाटा ते अंजाळे रस्त्याची जिवघेणे खड्डे निर्माण झाल्याने याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यावल तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असुन यातील यावल ते भुसावळ दरम्यानचा राजोरा फाटा ते अंजाळे गावापर्यताच्या रस्त्यावर जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभाराने कळस गाठला असुन या गंभीर विषयाकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांनी त्वरीत लक्ष वेधुन या मार्गावरील रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी असंख्य वाहनधारकांकडून करण्यात येत आहे

यावल ते भुसावळ कडे जाणारा मार्ग हा गुजरात आणी मध्यप्रदेश या दोघ शेजारच्या राज्यांशी जोडणारा आहे. तसेच भुसावळ हे रेल्वेचे जंवशन व मोठी बाजारपेठ असल्याने या मार्गाव नियमित सर्व प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर असते.

यातच, यावल ते भुसावळ दरम्यान असलेल्या राजोरा फाटा ते अंजाळे अशा महत्वाच्या मार्गावरील रस्त्याची अत्यंत भयावह करून सोडणारी दरावस्था झाली आहे. रस्त्यावर वाहन चालविणार्‍यांची यामुळे मोठी कसरत होत असते. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना या रस्त्याच्या अवस्थेकडे बघण्याची वेळ आहे का ? अशा संतप्त भावना वाहनधारकांनी व्यक्त केल्या आहेत.

सार्वजानिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन एक दोन वर्षात या रस्त्याची लाखो रुपये खर्च करून निकृष्ठ प्रतिची थातुरमातुर देखाव्याची दुरुस्ती केली जाते. मग काही दिवसांनी हा रस्ता खड्डे पडून त्याच्या जुन्या अवतारात समोर येत असल्याचे चित्र नेहमी दिसून येते. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठ पातळीवर या रस्त्याची दक्षता घेता त्वरित या मार्गावरील रस्त्याची गुणवत्तापुर्ण चांगल्या प्रकारची दुरूस्ती करावी अशी अपेक्षा असंख्य वाहन धारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version