Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्वे येथे विधी सेवा शिबीर उत्साहात संपन्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आर्वे येथे पाचोरा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विविध वक्त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.

 

विधी सेवा शिबिरासं मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून शिबाराची सुरवात करण्यात आली. यात पाचोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, २ रे सह न्यायाधीश एल. व्ही.श्रीखंडे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण पाटील, सदस्य ॲड एस. पी. पाटील, ॲड. एस. बी. माहेश्वरी, ॲड. एस. जी. नैनाव, ॲड. राजेंद्र परदेशी, ॲड. अनुराग काटकर, ॲड. मानसिंग सिद्धू, ॲड. प्रशांत नागणे, ॲड. अविनाश सुतार, ॲड. चंद्रकांत पाटील, ॲड. जाधव, ॲड. एल. एस. परदेशी, ॲड. संध्या साळुंखे, ॲड. ज्योती पाटील, ॲड. मनीषा पाटील, ॲड. मीना सोनवणे, ॲड. कल्पना खेडकर, सरपंच पती प्रविण पाटील, ग्रामविस्तारक अधिकारी सुनील पाटील यांचा समावेश होता.  सूत्रसंचलन ॲड. मानसिंग सिद्धू यांनी तर प्रास्ताविक ॲड. प्रवीण पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे वक्ते ॲड. एस. पी. पाटील यांनी शेतकरी व शेती व भाऊ बंदकी यांच्यात वाद होऊ नये तसेच त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया न जाता याकरिता काय करावे. यावर विस्तृत मार्गदशन केले. यानंतर महिलांच्या समस्या व होणारी पिळवणुक, हुंडाबळी इत्यादी विषयावर ॲड. संध्या साळुंखे यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रसंगी ग्रामसेवक संतोष शिवणेकर, रामचंद्र पाटील, पोलीस पाटील भगवान पाटील, प्रा. डॉ. योगेश पाटील, ग्राम पंचायत सदस्य संदीप पाटील, चिंधा बडगुजर गावातील नागरिक महिला पुरुषांना मोफत या विधी सेवा शिबिराचा लाभ व्हावा, गावातील भांडण तंटे गावातच मिटवावे जेणे करून गावकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जाणार नाही. गावातील छोट छोटे जसे की, शेताच्या बांधावरून, घराच्या अंगणावरून, नकळत काही वाद होतात. जमिनीचे भावाभावां मधील वाद होऊन ते विकोपाला जातात. यासाठी तसे महिलांच्या समस्या, हुंडाबळी, हुंड्यामुळे होणारा छळ, एखाद्या कामाच्या ठिकाणी होणारा छळ त्यातून होणारे वाईट परिणाम या सर्वांना आळा बसावा. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला मिळाल्यास ते यापासून कसे परावृत्त होतील याचे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर्वे येथील पोलीस पाटील भगवान पाटील, माजी सरपंच रामचंद्र पाटील, प्रा. डॉ. योगेश पाटील, ग्रामसेवक संतोष शिवणेकर, अशोक पाटील, रमेश पाटील, तुळशीराम पाटील, माणिक पाटील, बाबुलाल तडवी, शेकलाल तडवी, सदाशिव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील आदींनी सहकार्य केले. तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

 

Exit mobile version