Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे जुन्या वादातून एका रिक्षाचालकाला मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी आहे, विशाल प्रल्हाद अवजारे वय 46 राहणार श्रीकृष्ण कॉलनी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. सोमवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता विशाल अवचारे हे घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून अमोल नारायण पाटील रा. राजाराम नगर, जळगाव हा त्याच्या घराजवळ येऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लाकडी दंडाने मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता विशाल अवचारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल नारायण पाटील यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन तडवी हे करीत आहे.

Exit mobile version