कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रिक्षा पलटी; सहा प्रवाशी जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दुरदर्शन टॉवर समोर भरधाव रिक्षा जात असतांना अचानक कुत्रा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात रिक्षा पटली होवून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील बेडा येथील काहीजण लग्नाचा बस्ता करण्यासाठी चाळीसगाव येथे जाण्यासाठी रिक्षाने रविवारी २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निघाले. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या दुरदर्शन टॉवर जवळून भरधाव रिक्षाने जात असतांना अचानक रिक्षा समोर कुत्रे आडवे आले. त्याला वाचविण्याच्या नादात रिक्षा पटली झाली. यात रिक्षाचालक अमोल सुभाष वाघ, संगिता सुरेश वाघ, साहेबराव द्वारकू गवई (वय-६५), रेखा साहेबराव गवई (वय-५५), मंदा गणूदास वाघ (वय-४५) आणि जया गणूदास वाघ (वय-२१) सर्व रा. बेडा ता.जि.जळगाव हे जखमी झाले आहे. स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघात घडल्यानंतर मागून किंवा समोरून कोणतेही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या संदर्भात अद्याप पोलीसांत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content