Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यायाम शाळेजवळील ढापा त्वरित बसवण्यासाठी नगरवासीयांनी दिले नगरपालिकेला निवेदन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील दिल्ली दरवाजा जवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळे जवळ असलेल्या म्हसोबाच्या लगत गटारी वरील ढापे बसविणे बाबत नगरवासीयांनी नगरपालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना निवेदन तीन-चार दिवस अगोदर दिले आहे.

निवेदनात श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळे जवळ असलेल्या म्हसोबाच्या लगत गटारी वरील ढापे फारच नादुरुस्त झाल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे अपघात होण्याअगोदरच नगरपालिकेकडून सदर ढाप्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा काही मोठी घटना घडल्यास नगरपालिका जबाबदार राहील, गटारीवर ढापे नसल्याने तेथे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी आपण याबाबतचे गाभिर्य घेवून या गटारीवर तात्काळ ढापे टाकुन सदरच्या तक्रारीचे निवारण करावे असे म्हटले आहे. सदर निवेदनावर जाकिर उस्मान पिंजारी राजीव गांधी नगर, प्रियंका नवल चौधरी, काजल सुनील पाटील, शिवानी कैलास चौधरी, कैलास दत्तात्रय चौधरी, पूजा समाधान चौधरी, रामचंद्र दगा मराठे, आनंदा रमण मिस्तरी यांसह राजीव गांधी नगर परिसरातील सुज्ञ नागरीकांच्या सहया आहेत.

Exit mobile version