डॉ.पायल तडवीप्रकरणी अमळनेर येथे आंदोलनाचा इशारा

ce8443fa 3786 4500 b887 6fbb8393e0e6

अमळनेर (प्रतिनिधी) मुंबई येथे डॉ.पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जातीयवादी व्यक्तींना तात्काळ अटक करावी, त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करीत कठोर कार्यवाही न केल्यास युवकांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन आज उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांना विविध संघटनांच्या युवकांनी दिले.

store advt

यावेळी रणजित शिंदे यांनी, ‘डॉ.पायल तडवी यांची आत्महत्या ही जातीयवादी मानसिकतेच्या छळाचा बळी आहे म्हणून बहुजन युवकांच्या भावना संतप्त आहेत म्हणून शासनाने याप्रकरणी गंभीर दखल घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी यांना सांगितले.सदर निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचेसह युवा कार्यकर्ते मंगेश मोरे, सलिम तडवी, मुकेश सैंदाणे, मछिंद्र वसावे, नुशरत तडवी, पंकज पाटील, राहुल जाधव, पंकज मनोरे, देवाशिव पाटील, विपुल मोराणकर,गोरख गायकवाड, दिपक पानसे आदिंसह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “डॉ.पायल तडवीप्रकरणी अमळनेर येथे आंदोलनाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!