Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे जळगावात धरणे आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे जळगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. देशभरातील ३१ राज्य, ५५० जिल्ह्यांमधील ५००० तहसील आणि ५० हजार ग्रामपंचायत पातळीवर पहिल्या टप्प्यातील आंदोलन झाले होते. तर आज दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्धार करण्यात आला होता.

संविधान बचाव संघर्ष समितीच्या आंदोलकांनी ईव्हीएम मशीन संपूर्ण बंद करून, बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यात याव्यात, संविधानतील १२४ वी संशोधन बिल ठेवले गेले, पण यावर कोणत्याही प्रकारे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये चर्चा न करता सवर्णांना १० टक्के आरक्षण देणे, हे असंविधानिक कृत्य असल्याचा आरोप केला आहे . वर्तमान सरकार हे संविधान विरोधी सरकार आहे, ते नेहमी संविधान बदलविण्याची भाषा करतात, यांच्या षड्यंत्र विरोधात सर्व बहुजन समाज संघटीत करून आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नारायण सोनावणे, भूषण हजारे,किरण बिऱ्हाडे, देविदास सपकाळे,कालिदास सपकाळे,सुमित पाटील, संजय सपकाळे,आबा सपकाळे, गुलाब कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version