Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांच्या हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा : पं. स. सभापती स्मितलताई बोरसे

240f556f b399 44e3 b411 f5247f6908a0

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप व इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उर्तीण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे, हे कौतुकास्पद बाब आहे.विद्यार्थ्यांच्या हाती राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा, असल्याने त्यांनी देखील अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापती स्मितलताई बोरसे यांनी केले. त्या रयत सेना व गुजरात अंबुजातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी केले.

रयत सेना व गुजरात अंबुजा यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात शालेय साहित्य वाटप  व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन स्मितल बोरसे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटल्या की, विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्राची प्रगती व भविष्याची धुरा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी रयत सेनेचा हा उपक्रम त्यांच्यासह सर्वांच्या आठवणीत राहील, असे सांगत या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर पं.स.उपसभापती संजय पाटील,पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,स्वाभिमानी भारतचे संयोजक धर्मभूषण बागुल,उद्योगपती वर्धमान धाडीवाल, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटील, गुजरात अंबुजा प्रकल्प अधिकारी वैभव पाटील, एच.आर.मॅनेजर योगेश काळे,प्रा. रवी चव्हाण, नगरसेवक चिराग शेख,भिकन पवार,प्रगत संस्थेचे खुशाल पाटील,बबन पवार,कन्नड तालुका अध्यक्ष पप्पू पाटील, पत्रकार मुराद पटेल,खडकी बु.चे पोलीस पाटील विनायक मांडोळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रयत सेनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गणेश पवार यांनी सांगितले की, रयत सेनेच्या माध्यमातून गेल्या १५ ते १६ वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य, विद्यार्थी,शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढे असतो. यापुढे ही वंचित पिडीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार आहे. इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत उर्तीण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून दर वर्षी शालेय साहित्य वाटपाचे आयोजन करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वाघ म्हणाले की, गणेश पवार यांची विद्यार्थ्यांसाठी असलेली तळमळ आम्ही नेहमी बघतो. असे खूप कमी लोक असतात की, ते दुसऱ्यांसाठी झिजतात विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा खुप मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.  गुजरात अंबुजा प्रकल्प अधिकारी वैभव पाटील म्हणाले की, कोणाला कशाची गरज आहे?, हे ओळखून त्यांना काय देता आल पाहिजे. हेच काम रयत सेनेच्या माध्यमातून गणेश पवार व त्यांचे सहकारी करत असल्याचे गौरवउद्गार त्यांनी  काढले.  तर  पंचायत समिती उपसभापती संजय पाटील म्हणाले की, रयत सेना या छोट्याशा रोपाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कोणाकडे किती पैसा आहे?, ते महत्त्वाचे नसून दातृत्वातून देणे, हेच महत्त्वाचे असून ते काम रयत सेनेच्या माध्यमातून गणेश पवार करीत आहेत. विद्यार्थी गुणगौरव आणि शालेय साहित्य वाटप हा उपक्रम हीच मोठी सेवा आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात नालंदा विद्यालय, राष्ट्रीय विद्यालय, तहेजीब उर्दू हायस्कूल तसेच ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह २०० विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, कंपास,पॅड आदी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील,सचिव प्रमोद वाघ, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, दीपक राजपूत,आकाश धुमाळ, तालुका अध्यक्ष किशोर पाटील,शहराध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,विलास मराठे,मनोज पाटील,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, आडगाव शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष अजीज खाटीक, सचिन अव्हाड,रवींद्र पाटील, विकास पवार,ऋषिकेश चव्हाण,जयदीप पवार, एकनाथ पाटील,सतीश पवार,सुनिल पवार, दिलीप पवार, भागवत कुमावत, रमेश पवार, रामदास पवार,नालंदा विद्यालयाचे शिक्षक किरण कोळी यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अधिक परीश्रम स्वप्नील गायकवाड,सागर यादव, प्रवीण पवार,गौरव पाटील, अनिकेत शिंदे,मोहन भोई, चेतन पवार,कार्तिक पवार, गणेश पवार आदींनी घेतले. तर सूत्रसंचालन सचिन नागमोती व दीपक चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळासाहेब पवार यांनी केले.

Exit mobile version