Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्राध्यापक तरूणीची केली अशी बदनामी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून प्राध्यापक तरूणीच्या ओळखीच्या व्यक्तींना अश्लिल फोटो पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोदवड शहरातील प्राध्यापक असलेल्या २४ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर रोजीच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने तरूणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तीच्या ओळखीचे व मित्रांना रिक्वेस्ट पाठवून तिची बदनामी व्हावी यासाठी बनावट खात्याच्या स्टेटसवर महिला व पुरूषांचे अश्लिल फोटो ठेवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणीने शनीवारी २४ सप्टेंबर रोज जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाही ५ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत करीत आहे.

Exit mobile version