Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीएसटी विवरणपत्राची प्रक्रिया आणखी सुलभ होणार

gst

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जीएसटी विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षापासून आणखी सुलभ होणार आहे. विशेष करून, शून्य परताव्याचा दावा करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही प्रक्रिया अधिक सोपी होईल. यामुळे नेहमीची ऑनलाइन विवरणपत्र दाखल प्रक्रिया पार पाडण्याची त्यांना गरज नसेल. एसएमएस व ओटीपीच्या (वन टाइम पासवर्ड) साह्याने ते आपले विवरणपत्र सादर करू शकतील.

याबाबत अधिक माहिती अशी की, जीएसटी भरणाऱ्यांची संख्या सध्या १.२ कोटी आहे. यातील जवळपास २३ टक्के व्यावसायिक कर विभागाकडून कोणत्याही परताव्याचा दावा करत नाहीत. यातील अनेकांनी जीएसटीमध्ये नोंदणी केली आहे, मात्र प्रत्यक्ष व्यवसायास सुरुवात न केल्याने कर परताव्यापोटी कर विभागाकडून त्यांना काहीच येणे नसते. या व्यावसायिकांना अन्य व्यावसायिकांप्रमाणे विवरणपत्राची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हे टाळण्यासाठी जीएसटी परिषदेकडून ही नवी सुविधा दाखल करण्यात येणार आहे.

Exit mobile version