राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाने सेवानिव्रृत्तीच्या दिवशीसुद्धा केले परीक्षेचे सुपरव्हिजन  

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या सेवानिवृतीच्या दिवशीदेखील सुपरव्हिजनचे काम करत शिक्षकाच्या कर्तव्यावरील निष्ठेचे आदर्श उदाहरण दिले आहे.

जि प उच्च प्राथमिक शाळा धरणगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ गिरधर पाटील हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते; परंतु त्या दिवशी नवोदय परीक्षा देखील होती परंतु त्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी इंदिरा कन्या शाळेत जवाहर नवोदय परीक्षेचे सुपरव्हिजनचे काम करून विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम  शिक्षकाची कर्तव्यावरील निष्ठा याचा पुढील पिढीसाठी एक आदर्श ठेवला आहे.

त्यांचा नवोदय विद्यालयाचे प्रतिनिधी दिनेश गायकवाड यांच्या हस्ते सेवापूर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास केंद्रप्रमुख मनोहर पवार, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, ग्रेडेड मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, कैलास पवार, दिलीप बाविस्कर, गोपाल विसावे, प्रवीण सूर्यवंशी, सुरेंद्र सोनवणे, छोटू धनगर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केलं. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थित होती.

Protected Content