Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुन्हा रेपो दर कमी होण्याची शक्यता

RBI

मुंबई वृत्तसंस्था । आरबीआयच्या त्रैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून (दि.२) सुरूवात होत आहे. तथापि, बैठकीतील निर्णय ५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत पुन्हा रेपो दर कमी होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आलेली ही सलग सहावी व्याजदरकपात ठरण्याची शक्यता आहे. गेले वर्षभर देशात आर्थिक मंदीने ठाण मांडले आहे. या पार्श्वभूमीवर पतधोरण समितीने फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पाच बैठकांमध्ये पाच वेळा रेपो दरात कपात केली आहे. पाच बैठकांमध्ये व्याजदरात १.३५ टक्के कपात करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व्याजदरांमध्ये कपात करूनही अर्थव्यवस्था रूळावर येण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’ आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे निदर्शक असणाऱ्या आकडेवारीमध्ये सातत्याने घटच होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा रिझर्व्ह बँकेवर व्याजदरांमध्ये घट करण्याचा दबाव वाढत आहे. केंद्र सरकारतर्फे गेल्याच आठवड्यात जारी झालेल्या आकडेवारीनुसार ३० सप्टेंबर अखेरच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ‘जीडीपी’ वृद्धीचा दर साडेचार टक्क्यांवर आला आहे.

Exit mobile version