Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव शहरातून प्लंबरची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शेरा चौक येथून एका तरुणाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या संदर्भात अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहम्मद अहमद हसन शेख वय-३१, रा. तांबापुरा जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून प्लंबिंगचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान सोमवार १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता तो शेरा चौक येथील एका हार्डवेअर दुकानासमोर दुचाकी क्रमांक (एमएच १९, एव्ही ७७८९) ने आला होता. त्यावेळी त्यांनी दुचाकी दुकानासमोर पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ही २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून दिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहम्मद अहमद याने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु त्याला दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरुवारी १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.

Exit mobile version