Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याला तीन महिन्याची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला चाळीसगाव तालुक्यात राजदोहरे मारहाण केल्याप्रकरणी निवृत्ती रामभाऊ बागूल याला दोन कलमांखाली प्रत्येकी तीन महिन्यांची शिक्षा व ५०० रुपये दंड अशी शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश शरद पवार यांनी शनिवारी २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे.

याबाबत अधिक असे की, २९ जानेवारी २०२० रोजी वीज वितरण कंपनीचे तीन कर्मचारी निवृत्ती बागूल (रा. राजदेहरे, ता. चाळीसगाव) यांच्याकडे घराच्या व पिठाच्या गिरणीच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी थकीत रक्कम भरण्यास नकार दिला असता कर्मचारी सोमनाथ जाधव हे वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी वीज खांबावर चढले असता बागूल याने त्यांचा पाय धरून खाली ओढले व त्यांना मारहाण केली. तसेच जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता व दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. यात पाच साक्षीदार व पंचांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. यात जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांनी बागूल यास दोषी धरून तीन महिन्यांची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड सुनावला आहे. तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता नीलेश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले

Exit mobile version