Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ अपघातात मृत्यूमुखी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावरून घरी जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला मालवाहू ॲपे रिक्षाने समोरून जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कानळदा गावानजीक घडली आहे. तीन बहिणांचा एकुलता एक भावाचा अपघातात काळाने हिरावून नेल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आली आहे. कपिल अशोक सपकाळे (वय-२४) रा. कठोरा ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कठोरा गावातील रहिवाशी असलेला कपील सपकाळे हा आपल्या आई व वडीलांसोबत वास्तव्याला होता. जळगाव शहरात खासगी नोकरीला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कपील हा त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एजे ६२८४) ने घरी जाण्यासाठी कानळदा मार्गे कठोरा येथे जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यावरील कानळदा गावाजवळून जात असतांना एका अज्ञात मालवाहू ॲपे रिक्षा (क्रमांक एमएच १९ एस ७९००)ने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कपीलचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेतली. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मालवाहू रिक्षा ताब्यात घेतली आहे. तर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मयत लोकेशच्या पश्चात आई, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले वडील आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. तिन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version